रोहित शर्माकडे येणार मोठी जबाबदारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ मे २०२३ ।  सध्या सुरु असलेल्या आयपीएल मोठ्या उत्साहात सुरु आहे. यात मुंबई इंडियन्सला पाच जेतेपद रोहित शर्माने पटकवून दिले आहे. त्यामुळे फ्रेंचाईसीने त्याला तीन संधी दिल्याचं बोललं जात आहे रोहित शर्माचं वय आता 36 असून मुंबई इंडियन्स आता नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. मुंबईला तारू शकेल अशा खेळाडूची यासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी तरूण आणि मुंबईला पुढे घेऊन जाणाऱ्या खेळाडूंच्या नावाची चर्चा रंगली आहे.

सध्या सूर्यकुमार यादवकडे मुंबईच्या उपकर्णधारपदाची धुरा आहे. मात्र त्याचं वय पाहता त्याच्याकडे कर्णधारपद सोपवणं तसं कठीण आहे. त्यामुळे रोहित शर्माऐवजी संघाची धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह किंवा तरुण खेळाडू असलेल्या ईशान किशनकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. ईशान किशनने अंडर 19 भारतीय संघाचं 2016 मध्ये नेतृत्व केलं आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये जेतेपद पटकावलं आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल इतिहासात नकोसा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. तर या स्पर्धेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

रोहित शर्माचा फॉर्म पाहता काही माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली आहे. इतकंच काय त्याला आराम देण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स पुढच्या हंगामात रोहित शर्माला रिलीज करण्याची करण्याची शक्यता आहे.  सध्याचा मुंबईचा संघ – रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम