सोन्याच्या दरात मोठी चढ उतार ; जाणून घ्या काय आहे भाव ?
दै. बातमीदार । २६ मे २०२३ । सध्या लग्नाची धामधूम काही प्रमाणात शांत झालेली असतांना भारतातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे आज सोन्याचा भाव उच्चांकी स्तरावरून एक हजार रुपयांच्या आसपास नोंदवला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही लवकर सोने खरेदी केले नाही, तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल. देशभरात 24 कॅरेट/22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याच्या दरात घट नोंदवण्यात आली. गेल्या 24 तासांत भावात 220 रुपयांची घसरण दिसून आली आहे. भारतात 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 60,140 रुपये नोंदवला जात आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) ची किंमत 55,090 रुपये आहे.
देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 60,860 रुपये होता, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 56,800 रुपये नोंदवला गेला. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 60,710 रुपये होता, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 55,650 रुपये नोंदवला गेला.
आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) दर 60,710 रुपये नोंदवला गेला. याशिवाय 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 55,650 रुपये होती. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याची किंमत 52,285 रुपये आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम)ची किंमत 47,927 रुपये आहे. जर तुम्ही देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता उशीर करू नका. तुम्ही लवकरच 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला नवीनतम दरांची माहिती मिळेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम