बिग बॉसच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ‘राधाचा’ मोठा खुलासा; कोण आहे तो? जाणून घ्या सविस्तर…

बातमी शेअर करा...

बिग बॉस मराठी च्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झालेली राधा पाटील (मुंबईकर) सध्या चर्चेत आली आहे. राधा पाटील ही डान्सर आहे. गौतमी पाटीलशी कायम तिची तुलना होत असते. गावागावात राधाचेही डान्स शो गाजतात.

तसंच तिने काही म्युझिक व्हिडीओही केले आहेत. आता बिग बॉस मुळे ती आणखी प्रसिद्धीझोतात आली आहे. बिग बॉसच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये राधाने तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केला. कोण आहे तो?

बिग बॉसच्या कालच्या एपिसोडमध्ये राधा पाटील आणि अनुश्री माने गार्डन एरियामध्ये गप्पा मारत बसलेल्या असतात. तेव्हा राधा अनुश्रीला तिची लव्हस्टोरी सांगते. तसंच यावर अनुश्रीही तिच्या बॉयफ्रेंडला ओळखत असल्याचं समजतं. राधा म्हणते,”आम्ही २ बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. आमची खोली वेगळी आहे. काही वर्षांपासून आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहोत. मला जर कोणी बोललं तर त्या व्यक्तीला तो सोडणार नाही. तो निर्व्यसनी आहे. आमच्या नात्याला ३ वर्ष झाली पण आजही तो स्वत:च्या हाताने जेवत नाही. मी भरवल्यावरच तो खातो. आता मी इथे आहे त्यामुळे मला सतत वाटतंय की त्याचं कसं होत असेल? मुलींची कायम इच्छा असते ना की आपल्याला ‘देसी बॉय’ मिळावा. माझा बॉयफ्रेंड अगदी तसाच आहे.”

ती पुढे म्हणाली, “इथे शोमध्ये सगळे मला इतकं बोलत आहेत. तो जर इथे असता तर त्यांना मारुन निघून गेला असता.’ नंतर अनुश्री म्हणते, ‘मलाही आता एक बॉयफ्रेंड शोध…हो आणि मीही तुझ्या बॉयफ्रेंडची चाहती आहे. म्हणजे मी तुझीही चाहती आहे. पण मला त्याचं एक गाणं खूप आवडतं.” अनुश्रीच्या बोलण्यावरुन राधाचा बॉयफ्रेंड गायक असल्याचं समजतं. तसंच बॉयफ्रेंडचं नाव मात्र शोमध्ये म्युट केलं आहे. त्यामुळे राधाचा बॉयफ्रेंड कोण हे अद्याप समजलेलं नाही.

राधा पुढे म्हणते, “आम्ही जेव्हा फिरायला जातो तेव्हा लोकांना माझ्यासोबत नाही तर त्याच्यासोबत फोटो काढायचा असतो. लोक त्याच्यासाठी अक्षरश: वेडे आहेत. पण तो माझा हात कधीच सोडत नाही. इतक्या वर्षांनंतरही आमच्यातलं प्रेम कमी झालेलं नाही. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. मी त्याच्यावर ओरडते, चिडते पण तो सगळं सहन करतो. मला आता त्याच्या आठवणीत रडायला येतंय.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम