बिलकीस बानो हत्याकांडातील आरोपींची माफी रद्द करा अमळनेर ए आय एम आय एम पक्षाची मागणी

बातमी शेअर करा...

अमळनेर ( प्रतिनिधी ) शहरातील ए आय एम आय एम पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सन्माननीय राष्ट्रपती महोदयांना गुजरात येथील बिलकीस बानो हत्याकांडातील सर्व आरोपींची माफी रद्द करण्याची मागणी करण्यात आली
अमळनेर उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदयांना ए आय एम आय एम पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गुजरात राज्यात सन २००२ मध्ये झालेल्या बिलकीस बानो यांच्यावर सामुहिक अत्याचार तसेच त्यांच्या कुटुंबातील ७ लोकांची केलेल्या हत्या प्रकरणात ११ अपराधी तुरुंगात होतें त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली होती गुजरात सरकारने माफीच्या अधीन राहून ( रेमिशन पाॅलिसी ) १५ अगस्त २०२२ रोजी सर्व ११ विख्यात आरोपींना कारागृहातून सुटका करून देण्यात आली आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिलांच्या सन्मान व हक्क साठी तीन तलाक असे अनेक कायदे महिलांच्या हक्कांसाठी करत आहेत तरि मा पंतप्रधान व मा राष्ट्रपती महाशयांनी या बाबींकडे लक्ष देउन गुजरात सरकारचा माफीचा हुकुमनामा रद्द करण्यात यावा आणि त्या ११ नरधमांना पुनश्च जेल मध्ये टाकण्यात यावे अशी विनंती करून निवेदन देण्यात आले यावेळी ए आय एम आय एम पक्षाचे शहर अध्यक्ष हाजी सईद शेख, उपाध्यक्ष कलीम शेख, उपाध्यक्ष अल्तमश शेख, अल्ताफ रजा, सैय्यद आकिब, शोएब सैय्यद,वाजीद मेवाती,कैफ अन्सारी सह आदि उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम