बिपाशा बासू होणार आई पण नेटकऱ्यांनी केले फोटोवर ट्रोल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ नोव्हेबर २०२२ हल्ली प्री-वेंडिग प्रमाणे डिलिव्हरीच्या आधी मॅटरनिटी फोटो शुट करण्याची क्रेझ आहे. सध्या बॉलीवूडमध्ये भरपूर अभिनेत्रीमध्ये डिलिव्हरीचे वातावरण निर्माण झाले आहे. काजल अग्रवाल, सोनम कपूर यांच्या डिलिव्हरी नंतर आता आलिया भट्ट आणि बिपाशा बासू यांच्या डिलिव्हरीची वेळ जवळ येत आहे. जसे जसे डिलिव्हरीची वेळ जवळ येते तेंव्हा वेध लागते ते मॅटरनिटी फोटो शुटचे. बिपाशा बासुने देखील असेच मॅटरनिटी फोटो शुट केले आहे, पण तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

२०१६ मध्ये बिपाशा बासू आणि करणं सिंग ग्रोहर लग्न बंधनात अडकले. आणि आता हे दोघे लवकरच आई-बाबा होणार आहे. हल्ली प्री-वेंडिग प्रमाणे डिलिव्हरीच्या आधी मॅटरनिटी फोटो शुट करण्याची क्रेझ आहे. बिपाशा ने देखील मॅटरनिटी फोटो शुट केले आहे.बिपाशा ने गोल्डन शिमरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. आणि तिचा बेबी बंप मस्त दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे तेज खुलून आले आहे. पण बिपाशाच्या या शुटला ट्रोल केले जात आहे.

 

एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हे फिल्मी कलाकार मॅटरनिटी फोटो शुटच्या नावाने अंगप्रदर्शन करतात” तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “अरे तुमच्या प्रसिद्धीसाठी होणाऱ्या बाळाला तरी सोडा”. तर एक म्हणतो, “बॉलीवूडवाले पैशासाठी काय पण करतील, हे लोक मुलं जन्माला घालतात ते पण प्रसिद्धीसाठीच” तर काही युजर्स ने बिपाशाचे कौतुक केले आणि तिला शुभेच्छाही दिल्या आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम