
चाळीसगाव नगरपालिकेत आ. किशोर पाटील यांनी एक नगरसेवक निवडुन आणावा, मी त्यांचा सत्कार करेल
चाळीसगाव नगरपालिकेत आ. किशोर पाटील यांनी एक नगरसेवक निवडुन आणावा, मी त्यांचा सत्कार करेल
पाचोऱ्यात आ. मंगेश चव्हाण यांचे आव्हान
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचा भारतीय जनता पक्षाचा भव्य परिवर्तन मेळावा ५ नोव्हेंबर रोजी सारोळा रोडवरील समर्थ लाॅन्स पाचोरा येथे हजारो भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
सदर परिवर्तन मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खा. स्मिता वाघ, आ. मंगेश चव्हाण, भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे, प्रताप पाटील, भाजपा उप जिल्हा अध्यक्ष मधुकर काटे, डी. एम. पाटील, अमोल पाटील, सुभाष पाटील, सुचिता वाघ, संजय वाघ, सुलभा तेली, गोविंद शेलार, प्रदीप देसले यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला च्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
पाचोरा – भडगाव मतदार संघात सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाचे मोठे संघटन असून पंचायत समितीमध्ये देखील भाजपाची सत्ता यापूर्वी राहिलेली आहे व जिल्हा परिषदेत देखील सदस्य निवडले गेले आहेत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घ्यावा मात्र हे करत असताना भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी अजितदादा गट या तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वावर टीका टिप्पणी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश असताना देखील पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. एकीकडे विकासकामांना निधी मिळत नसल्याचे आमदार किशोर पाटील सांगतात मात्र दुसरीकडे पूर्ण पाचोरा – भडगाव मतदार संघ हा अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान झालेल्या असताना देखील बागायती ऐवजी जिरायती पंचनामा लावल्यामुळे अतिवृष्टी अनुदान मिळण्यात शेतकऱ्यांचे ३० ते ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले याची मात्र काळजी आमदार किशोर पाटील यांना नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे शिलेदार निवडून दिले तर ते निश्चितपणे या गोष्टींवर लक्ष ठेवून शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी शेतकऱ्यांसाठी, मतदार संघासाठी खेचून आणतील. भारतीय जनता पक्षाने मला मोठे केले आहे, त्यामुळे पक्षाने जबाबदारी दिली, जो आदेश दिला तो पाळण्यासाठी प्राण पणाला लावणारा मी कार्यकर्ता आहे. आप्पा माझे मित्र होते, त्यांच्यासाठी सन – २०२४ विधानसभेला मी त्यांच्या नातेवाईकांना सांगितले की, माझी काळजी करू नका आप्पांना तुमची गरज आहे. आज पक्षाने पाचोरा भडगाव मतदार संघात निवडणुकांची जबाबदारी माझ्याकडे दिल्यामुळे कार्यकर्त्यांसाठी, पक्षासाठी त्यांच्यासोबत उभे राहणे हे मी माझे कर्तव्य समजतो. आ. किशोर पाटील यांनी देखील माझ्या मतदारसंघात लक्ष घालावे मात्र जाती पातीचे राजकारण न करता त्यांनी विकासाचे राजकारण करावे. मी माझ्या मतदारसंघात जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करतो. त्यामुळे तिथला प्रत्येक माणूस हा मला त्याच्याच जातीचा समजतो. त्यांनी चाळीसगाव मध्ये जातीचे कार्ड खेळले म्हणून मी इकडे जातीचे कार्ड पुढे करून मत मागावीत हे माझे विचार नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका या जातीपातीच्या नाही तर विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातील असे ही आ. मंगेश चव्हाण यावेळी जाहीर केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम