ठाकरेंचा अयोध्या दौरा भाजपने केला रद्द ; मनसेच्या नेत्याची टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जानेवारी २०२३ राज्यात गेल्या मागील महिन्यापासून भाजपचे काही नेत्यांनी शिवतीर्थवर जात राज ठाकरे यांची भेट घेत होती त्यामुळे राज्यातील राजकारणाला आता वेगळे वळण लागून भाजप व शिंदे गटासोबत मनसे येणार का ? असा प्रश्न सोशल मिडीयावर जनता विचारू लागली होती. पण नुकतीच पुणे येथे दि ८ रोजी राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केल्यानंतर या प्रश्नाला आता विराम बसला आहे. तर आज सकाळी मनसेच्या एका नेत्याने अयोध्या दौरा रद्द करण्यामागे भाजप असल्याचे संग्तील्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यात एका मुलाखती दरम्यान राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींना देशातील सर्व राज्ये समान आहेत पण मोदी केवळ गुजरातकडेच लक्ष देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. राज ठाकरे यांनी कालच ही टीका केली असतानाच मनसेच्या आणखी एका बड्या नेत्याने राज ठाकरे यांचा अयोध्येच्या दौऱ्यावरून भाजपवर टीका केली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. त्यांच्या या खळबळ उडाली आहे. तसेच मनसे आणि भाजपमध्ये सगळं अलबेल आहे की नाही? अशी चर्चा या दाव्यामुळे सुरू झाली आहे.

प्रकाश महाजन बोलताना म्हणाले की, राज ठाकरेंनी हिंदूत्वाची भूमिका स्वीकारली तेव्हा भाजपाच्या एका टिनपाट गुंडाने अयोध्येत न येण्याची राज यांना धमकी दिली. तेव्हा ही लोकं गप्प होती. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्याच्या पापात भाजप सामिल आहे, असा आरोप महाजन यांनी केला आहे.तर पुढे त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारलाही एक प्रकारे इशारा दिला आहे. तर बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी एवढ्या थराला जातेय की भावा भावत भांडण लावत आहे. आता नवीन सरकार आल्यानंतर सर्व लोक शिवतीर्थवर येतात. मात्र या सरकारला काही वाटत नाही की राज ठाकरेंवर असलेल्या खोट्या केसेस मागे घ्याव्यात. जर राज ठाकरे यांच्यावरील केसेस मागे घेतल्या नाही तर या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा महाजन यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम