अजित पवार गाताविरोधात भाजपचा उमेदवार !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक जिल्ह्यात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु असून राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार गट ग्रामपंचायत निवडणूक लढवीत आहे. तर या निवडणुकीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीमधील काटेवाडी ग्रामपंचायतीत आज मतदान होत आहे. विशेष म्हणजे अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले असले तरी काटेवाडीत मात्र अजित पवार गटाविरोधात भाजपच उभा ठाकला आहे. याठिकाणी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. मात्र, बहुतांश वेळी ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणारे पॅनेल हे एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित तरी असतात किंवा या पॅनेल्सना राजकीय पक्षांचा पाठिंबा तरी असतो. विशेषत: नेत्यांचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांमधील ग्रामपंचायत निवडणुकीला राजकीय किनार असतेच. बारामतीमध्येही आज असाच सामना रंगताना दिसून येत आहे. मात्र हा सामना सत्तेत गेलेल्या अजित पवार गट विरुद्ध भाजप असा असल्याने यात कोण बाजी मारणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम