दादा जवळ आल्याने भाजपला आमची गरज वाटेना !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ ऑक्टोबर २०२३

राज्याच्या राजकारणात नेहमीच अनेक नेत्यांचे वक्तव्य मोठ्या चर्चेत येत असते. सध्या शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता अजित पवार गटही सत्तेत सामील झाला आहे. त्याचवेळी २०१४ ते २०१९ या कालावधीत भाजपसोबत असलेले मित्रपक्ष दुर्लक्षीत झाले आहेत. यामध्ये महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष देखील होता. यावरून जाणकर यांनी खंत व्यक्त केली आहे.
महादेव जानकर म्हणाले की, मी सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार व जनतेत जनजागृती करण्यासाठी यात्रा करत आहे. ध्या भाजपा सोबत एकनाथ शिंदे- अजित पवार यांच्यासराखे मोठे लोक आले असून त्यांना आमची आता गरज नाही.

भाजपच्या आमदार, खासदारांच्या जागी राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. पंकजा मुंडे सक्षम असून जेव्हा त्यांना आडचण वाटेल तेव्हा त्यांना माहेरला आणायला मी सक्षम आहे असल्याचं जानकर यांनी म्हटलं. त्यांनी जन स्वराज्य यात्रेनिमित्ताने तेर येथे संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार समाधीचे दर्शन घेतले .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम