भाजपने दिला अजित पवारांना मोठा धक्का !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ ।  राज्यातील अनेक बाजार समितीचे निकाल जाहीर होत आहे. तर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष हवेली बाजार समितीकडे होते. या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता. भाजपने राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय पॅनेल तयार केले होते. भाजपच्या या पॅनलने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या पॅनलला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला. तीन अपक्षांनीही बाजी मारली.

हवेली बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांचे अनेक वर्षांपासून वर्चस्व होते.  पुणे जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांपैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. परंतु हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. इंदापूर, बारामती, मंचर, नीरा बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता आली. यामुळे पुण्यात राष्ट्रवादीचा गड आला पण हवेलीच्या माध्यमातून सिंह गेला अशी परिस्थिती झाली. चा निवडणुकीत उमेदवारी देताना राष्ट्रवादीने आयात उमेदवारांना प्राधान्य दिले. त्यामुळे पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले. राष्ट्रवादीतील सर्व नाराज एकत्र आले. त्यांनी भाजप, शिवसेना ठाकरे गटास मदत केली. यामुळे राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या.

पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर आधी काँग्रेस त्यानंतर गेल्या २४ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २४ वर्षांनंतर झाली. या ठिकाणी १९ वर्षे प्रशासक राज होते. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना झाला. परंतु राष्ट्रवादीला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम