भाजप प्रचारासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतोय ; राहुल गांधी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ ऑक्टोबर २०२३

राज्यातील दोन महिन्यांपूर्वी ठाणे व आता नांदेडसह छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्येही रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अवघ्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर काल रात्री पुन्हा सात जणांना मृत्यू झाला. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला. चिंताजनक बाब म्हणजे या मृतांमध्ये बालकांचे प्रमाण अधिक आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

केवळ आपल्या प्रचारासाठी भाजप सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, याच सरकारकडे मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. भाजप सरकार आपल्या प्रसिद्धीवर हजारो कोटी रुपये खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी भाजप सरकाकडे पैसे नाहीत? भाजपसाठी गोरगरीबांच्या आयुष्याची काहीच किंमत नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम