बिहारमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात भाजप नेत्याचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जुलै २०२३ ।  देशातील बिहार विधानसभेमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राडा झाला असून यानंतर भारतीय जनता पक्षाने नितीश कुमार सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये भाजपच्या नेत्याचा मृत्यू झाला. विजय कुमार सिंह असे भाजप नेत्याचे नाव आहे. ते सरचिटणीस पदावर कार्यरत होते.

विधानसभेमध्ये निदर्शने केल्यानंतर भाजप नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. पाटणा येथील डाकबंगला चौकात आंदोलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असा आरोप भाजप नेत्यांनी केला. या लाठीचार्जमध्ये विजय कुमार सिंह जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामुळे बिहारधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये आमच्या पक्षाच्या एका नेत्याचा मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी असून आम्ही पोलिसांवर गुन्हा दाखल करू. या घटनेला मुख्यमंत्री नितीश कुमार जबाबदार आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी दिली.

 

जे.पी. नड्डा यांचे ट्विट
पाटण्यात भाजप कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज हा राज्य सरकारच्या अपयशाचा आणि रागाचा परिणाम आहे. भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी महाआघाडीचे सरकार लोकशाहीवर आघात करत आहे, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाही नैतिकतेचा विसर पडून आरोपपत्र झालेल्या व्यक्तीला वाचवले आहे, असे ट्विट नड्डा यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम