अजित पवारांना दिला थेट भाजप नेत्याचा इशारा; तिथ येवून १२ वाजवीन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील राजकारण कसबा पोटनिवडणुकीवरून प्रचंड तापले आहे. त्यातच आता या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं नारायण राणे आणि अजित पवार यांचा वाद शिगेला पोहचला आहे. नुकतेच अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना जे जे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. ते ते नेते पराभूत झाले आहेत. नारायण राणे तर दोन वेळा पराभूत झाले आहेत. एकदा कोकणात तर आणि एकदा मुंबईतून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा हा पराभव एका महिलेनं केला आहे असा टोलाही अजित पवार यांनी त्यांना लगावला होता.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची ही टीका नारायण राणे यांच्या जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी अजित पवार यांना बारामतीच्या बाहेरच किती कळतं माहिती नाही मात्र त्यांनी माझ्या नादाला लागू नये नाही तर बारामतीत येऊन मी बारा वाजवणार असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना त्यांना एका महिलेनं पाडलं असं म्हणत आणि एकदा नाही दोनदा त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं असा जोरदार हल्लाबोल त्यांच्या्वर करण्यात आला होता.

त्यामुळे चिडलेल्या नारायण राणे यांनी अजित पवार यांना किती कळतं असं म्हणत त्यांना बारामतीबाहेरचं त्यांना काही माहिती नाही असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे. मी वांद्र्यात पराभूत झाला असला तरी तो माझा मतदार संघ नव्हता, माझं कार्यक्षेत्र हे मुंबई आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणात पाठवले. त्यानंतर मी कोकणातून एकदा नाही तर सहा वेळा निवडून आलो अशी माहितीही त्यांनी अजित पवार यांना दिली आहे. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका नाही तर मी बारा वाजवणार असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम