भाजप नेत्यांची उद्धव ठाकरेंवर सडेतोड टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० जुलै २०२३ | राज्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे व भाजपसह शिंदे गटाचे राजकीय भांडण नियमित झाले असून या पक्षाने जर आरे केले तर विरुद्ध दिशेने लागलीच कारे शब्द येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सुरु असलेली कुरघोडी कुठेही थांबायचे नाव घेत नाही. नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी दि. 29 रोजी येथे ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत भाजपवर केलेल्या टिकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पक्ष फोडण्याचे उद्योगधंदे राज्यात भाजपने सुरु केले आहेत. आम्ही कोणताही पक्ष फोडला नाही. जे आमच्याकडे येत आहेत त्यांना आम्ही नक्कीच प्रवेश देऊ.भाजप हा राजकीय पक्ष आहे. आम्ही संन्याशी नाही. उद्धव ठाकरे हे दररोज टीका करतात. घरातल्या घरात मुलाखती देतात. यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्ष संघटनेत लक्ष दिले तर त्यांच्या पक्षात शिल्लक राहिलेले नेते व कार्यकर्ते इतर पक्षात जाणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमधील सहभागाबद्दल विचारले असता, राजकारणाच्या शेवटी सगळेजण देशाचा विचार करतात आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असणारे सगळेच आमच्या सोबत येतील, असे सांगत बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे समर्थन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम