भाजपने आखला प्लान ; पंकजा मुंडेसह विनोद तावडे यांना मोठी संधी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जुलै २०२३ ।  देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकीसाठी भाजप देशात सज्ज झाले असून पक्षाने नवीन टीमची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. नवीन यादीमध्ये 13 उपाध्यक्ष आणि 9 सरचिटणीसांची नियुक्ती केली आहे. भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये फेरबदल केले. तेलंगणा भाजपचे माजी अध्यक्ष बंदी संजय कुमार यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मन्सूर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम