भाजप म्हणजे वॉशिंग मशीन ; काळ्याचे पाढरे करते ; ममता बॅनर्जी
दै. बातमीदार । ३१ मार्च २०२३ । देशात भाजपसह सर्वच विरोधी पक्षाचे मोठे राजकारण सुरु आहे. यातच कॉंग्रेसचे राहुल गांधी यांना भाजप टार्गेट करत असल्याचा देखील आरोप विरोधक करीत आहेत. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
मोदी सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात तपास यंत्रणेचा वापर सुरू आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. मात्र केवळ आरोप करूनच त्या थांबल्या नाहीत, तर हा आरोप जनतेला पटावा म्हणून त्यांनी थेट वॉशिंग मशीनच सोबत आणले आणि भाजपमध्ये गेल्यावर काळय़ाचे पांढरे कसे होते, असा लाइव्ह डेमोही दाखवला. ममता बॅनर्जी गेल्या दोन दिवसांपासून मोदी सरकारविरोधात येथे धरणे आंदोलनास बसल्या आहेत. दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ासमोर धरणे धरणार असे त्यांनी जाहीर केले होते; मात्र नंतर त्यांनी कोलकात्यातच धरणे धरले. अर्थात मोदी सरकारकडून पश्चिम बंगालवर सातत्याने अन्याय होत राहिला तर नवी दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करू, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.
ममता यांनी यावेळी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र्ा सोडले. त्या म्हणाल्या, विरोधी पक्षातील नेत्यांना सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास दिला जातो; परंतु हेच नेते जेव्हा भाजपात सामील होतात तेव्हा ते भोळे आणि निर्दोष होतात. त्यांच्यावरील आरोपच स्वच्छ होतात.
भाजपच्या मशीनची जादू
ममता बॅनर्जी चक्क ‘भाजप वॉशिंग मशीन’च घेऊन आल्या होत्या. या मशीनमध्ये काळा कपडा सफेद कसा होतो याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखवले. मशीनमध्ये त्या काळे कपडे टाकत होत्या आणि त्यातून सफेद कपडे बाहेर काढत होत्या. ही भाजपच्या वॉशिंग मशीनची जादू आहे, असे ममता म्हणाल्या. विरोधी पक्षातील नेत्यांना सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास दिला जातो; परंतु हेच नेते जेव्हा भाजपात सामील होतात तेव्हा ते भोळे आणि निर्दोष होतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम