भाजप लागली निवडणुकीच्या तयारीला ; यांना मिळणार संधी !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ मार्च २०२३ । राज्यात आगामी काळात लोकसभेसह विधानसभा तर महानगरपालिकेच्या निवडणुका होवू घातल्या आहे. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून नवीन नव्हे तर जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. भाजप आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पहायला मिळत आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जुन्या नेत्यांना साद घातली जात आहे. मागील काही वर्षे पक्षामध्ये सक्रिय नसलेल्या नेत्याना भाजप आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सक्रिय करणार आहे. नव्या दमाच्या पिढीसोबत भाजप अनुभवी नेत्यांनाही मैदानात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकांच्या तयारीला सुरुवात भाजपने आतापासूनच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तायरीला सुरुवात केल्याचं पहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर आता भाजपकडू जुन्या नेत्यांना साद घालण्याचं काम सुरू आहे. नव्या दमाच्या पिढीसोबत भाजपकडून अनुभवी नेते देखील निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात येणार आहेत. मागील काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय नसलेल्या नेत्यांना भाजपकडून निवडणुकीसाठी सक्रिय करण्यात येणार आहे.

जुन्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी गेले अनेक वर्ष भाजपसाठी निष्ठेने काम केलेल्या पण मागील काही दिवसांपासून पक्षीय राजकारणापासून दूर झालेल्या नेत्यांकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. स्व. उत्तमराव पाटील अमृतकुंज अभियानातील महत्त्वाची जबाबदारी भाजपच्या जेष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर मधु चव्हाण यांच्याकडे प्रदेश संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम