राज्यात भाजप मारणार बाजी ; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० डिसेंबर २०२२ ।  राज्यातील 34 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचा निकाल आज लागत आहे. त्यामध्ये एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं.राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं.

विशेष म्हणजे, यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. असं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांबरोबर नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच बाजी मारणार असा विश्वास व्यक्त केलाय.

नागपुरात पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना फडणवीसांनी भाजपाचाच विजय होईल, असं म्हटलंय. ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाल सांगतो, लिहून घ्या तुम्ही की महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केलं तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका, असं फडणवीसांनी सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम