शिंदेंच्या खासदारांच्या मतदार संघावर भाजपची नजर ?
दै. बातमीदार । ९ जून २०२३ । देशातील सर्वात मोठा पक्ष मानला जाणारा भारतीय जनता पार्टीने आता लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागली असून त्यासाठी राज्यातील भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे ज्या मतदार संघात खासदार आहेत. त्याच मतदार संघात भाजप मोठ्या ताकदीने कामाला लागली आहे. त्यामुळे भविष्यात शिंदेंची शिवसेना व भाजप यांच्यामध्ये युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदेंच्या शिवसेनेसोबत 13 खासदारांच्या जागेवरही भाजपानं निवडणूक प्रमुख नेमल्यानं राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यात नेमके हे 13 खासदार कोण आणि त्यांच्या जागेवर भाजपानं कोणाची लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली पाहूयात.
1) गजानन किर्तीकर: मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार असलेल्या शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांच्या मतदार संघात भाजपानं आमदार अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2) हेमंत गोडसे: नाशिक खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांच्या मतदारसंघात भाजपानं केदा नानाजी आहेर यांची नियुक्ती केलीय.
3) संजय मंडलिक : कोल्हापूर मतदार संघाचे खासदार असलेल्या संजय मंडलिकांच्या जागेवर भाजपाकडून राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची निवडणूक प्रमुख निवड करण्यात आली आहे.
4) धैर्यशील माने : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या धैर्यशील मानेंच्या मतदारसंघात सत्यजीत देशमुख यांची नियुक्ती भाजपानं केली
5) राजेंद्र गावीत: पालघरचे खासदार असलेले राजेंद्र गावित यांच्या मतदारसंघात भाजपानं नंदकुमार पाटील यांची लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपानं निवड केली आहे.
6) श्रीरंग बारणे : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांच्या मतदारसंघात भाजपानं प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती केली आहे.
7) श्रीकांत शिंदे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजपानं शशिकांत कांबळे यांची नियुक्ती केली आहे.
8) प्रतापराव जाधव: बुलढाणा लोकसभेचे खासदार असलेल्या प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात भाजपानं विजयराज शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
9) कृपाल तुमाने : रामटेक लोकसभेचे खासदार असलेल्या कृपाल तुमाने यांच्या मतदारसंघात भाजपाकडून अरविंद गजभिये यांची नियुक्ती केली आहे.
10) हेमंत पाटील : हिंगोलीचे खासदार असलेले हेमंत पाटील यांच्या मतदारसंघात भाजपाकडून रामराव वडकुते यांची नियुक्ती केली आहे.
11) सदाशिव लोखंडे: शिर्डी लोकसभेचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडेंच्या मतदारसंघात भाजपानं राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती केली आहे.
12) भावना गवळी: वाशिम लोकसभेच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या मतदारसंघात भाजपानं नितीन भुतडा यांची नियुक्ती केलीय..
13) राहुल शेवाळे: मुंबई दक्षिण मध्यचे खासदार असलेल्या राहुल शेवाळेंच्या जागेवर भाजपाकडून विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान भाजपानं केलेल्या लोकसभा प्रमुखांच्या निवडीमुळं शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्येही अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम