कसब्यातील विजयामुळे भाजपचे डोळे उघडले ; आ.धंगेकर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ मार्च २०२३ । पुण्याची पोटनिवडणूक राज्यभर गाजली होती यामुळे भाजपला चांगलेच तोंडघशी पडावे लागले होते तर कॉंग्रेसला मिळालेल्या यशामुळे राज्यात पुन्हा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये जोशाचे वातावरण निर्माण झाले होते. कसब्यातील कॉंग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज थेट भाजपवर टीका केली आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले कि, माझ्या झालेल्या विजयामुळे भाजपचे डोळे उघडले आहेत. म्हणून भाजप आता जनतेचे कामे करताना दिसत आहेत, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला. आमदार झाल्यानंतर आणि शपथविधीनंतर त्यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

मागील अनेक वर्षापासुन पुणे शहरातील नागरिकांना मिळकत करात सवलत मिळावी, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. या प्रयत्नांना यश आलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शहरातील मिळकतकरात 40 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे, असं ते म्हणाले. यासंदर्भात आम्हीदेखील अनेक आंदोलनं केली आहेत. मी आधी देखील सांगितल होत की आशिया खंडात सगळ्यात जास्त टॅक्स घेणारी ही पालिका आहे, असंही ते म्हणाले. आता 500 स्केवर फूट घरांसाठी कर कमी करावा ही मागणी करणार असल्याचं ते म्हणाले

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत,अशा शब्दात शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मला मत दिलं आणि निवडूण आणलं आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली, असं म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले.
पुणे शहरात जवळपास 10 लाख मिळकती आहे. त्या सर्व मिळकतधारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजपर्यंत मांडली. त्यामुळे आज आमदार म्हणून विधिमंडळात हीच मागणी केली. त्या मागणीला यश आलं असल्याचं ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम