भाजपचे मध्यरात्री ट्विट ; कर्नाटकातील निवडणुकीत खळबळ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ मे २०२३ ।  देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीची कर्नाटकातील निवडणूकित मोठी परीक्षा सुरु आहे. सोमवारी ८ मे संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. मात्र, भाजप मध्यरात्रीसुद्धा सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. मतदानाला एक दिवस बाकी असतानाच भाजपनं केलेलं मध्यरात्रीचे ट्विट सध्या चर्चेत आलं आहे.

प्रचार थांबल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी काल रात्री १२.२१ वाजता कर्नाटकच्या जनतेसाठी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भाजपला मत देण्याचे आवाहन केले आहे. ‘कर्नाटकला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारची गरज आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘तुमची स्वप्ने, ही माझी स्वप्ने आहे ती आपण आम्ही मिळून पूर्ण करू’. असं मोदींनी व्हि़डीओमध्ये म्हटले आहे.

 

सध्या कर्नाटकातील जनतेने डबल इंजिन सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील कारभार पाहिला आहे. भाजप सरकारची निर्णायक, केंद्रीत आणि भविष्यवादी धोरणे कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोनासारख्या महामारीनंतरही कर्नाटकातील भाजप सरकारच्या कार्यकाळात विदेशी गुंतवणूक आणि एफडी वार्षिक 90 हजार कोटी रुपयांवर आली होती, त्याचवेळी मागील सरकारच्या काळात हाच आकडा केवळ 30 हजार कोटी रुपयांच्या आसपास होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम