भाजपचे दुकान जोरात मात्र ग्राहक नवीन ; मंत्री गडकरी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑगस्ट २०२३ | केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बुलढाणा येथील एका कार्यक्रमात त्यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. आता भाजप मोठा झाला आहे, दाही दिशांना विस्तारला आहे. भाजपचे ‘दुकान’ जोरात सुरू आहे. मात्र या दुकानात नवीन ग्राहकच जास्त दिसत आहेत. जुने, ओरिजनल ग्राहक काही दिसत नाही, असा जबरदस्त टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्याच पक्षाला लगावला.

नितीन गडकरी म्हणाले, आज राजकारणाचा बाज बदलला आहे, व्याख्या बदलली आहे. आजचे राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण असे स्वरूप झाले आहे. आज भाजप सर्वोच्च शिखरावर आहे. यामागे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेला त्याग, परिश्रम हेच कारण आहे. जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात काम केले. तेव्हा आपल्या पक्षाला, त्यामुळे कार्यकर्त्यांना मान सन्मान प्रतिष्ठाही नव्हती. तेव्हा निवडणुका म्हणजे आपण हमखास पराभूत व्हायचो. त्यावेळी येथे बुलढाणा जिह्यातही अनेकांनी प्रवाहाच्या विरोधात काम केले. त्यांनी कधी मान सन्मानाची अपेक्षा ठेवली नाही. पक्षासाठी देशासाठी अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान केले. त्यातूनच आज हा पक्ष उभा आहे. जेव्हा दुकान चालायला लागते तेव्हा ग्राहकांची कमी नसते असे सांगून गडकरी पुढे म्हणाले, आता भाजपचे दुकान चांगले चालू आहे. ग्राहकांची कमी नाही, पण ओरिजनल ग्राहक कुठे दिसत नाही. माझ्यासारख्या लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे की आज जे चांगले दिवस आम्हाला पहायला मिळतायत ते जुन्या कार्यकर्त्यांमुळेच. त्यांची जाण ठेवा, असेही त्यांनी सुनावले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम