ईदच्या दिवशी पाकिस्तानात स्फोट ; ३० नागरिक ठार !
बातमीदार | २९ सप्टेंबर २०२३
पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील मशिदीजवळ शुक्रवारी आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये 34 जणांचा मृत्यू झाला, तर 130 जण जखमी झाले. मृतांमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. मृतांमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीसाठी लोक जमत असताना हा हल्ला झाला. डीएसपी नवाज गिश्कोरी यांच्या कारजवळच हा स्फोट झाला.
जिओ न्यूजच्या माहितीनुसार, या हल्ल्यात डीएसपी नवाज गिश्कोरी यांचा देखील मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानचे काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गरज पडल्यास जखमींना कराचीलाही हलवण्यात येईल. जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल अचकझाई पुढे म्हणाले की, आमच्या शत्रूंना विदेशी शक्तींच्या मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक स्थळांना लक्ष्य करून शांतता बिघडवायची आहे. असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. बलुचिस्तानमधील सरकारी मंत्री आणि इतर अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम