रास्ता रोको करीत पेटवल्या गाड्या !
बातमीदार | ४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. मागील दोन दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. मराठवाड्यातही रविवारी आंदोलने करण्यात आली. रविवारी अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला. लातूरमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली. परभणी, जिंतूरला रास्ता रोको करण्यात आला, तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी रविवारी बससेवाही बंद होती.
आंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्यालाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.ठिकठिकाणी रास्ता रोको केला गेला, तर अनेक गावांमध्येकडकडीत बंद पाळण्यात आला. आंतरवाली सराटी येथेरविवारीही आंदोलक त्यांच्या उपोषणावर ठाम असूनआरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा त्यांनीघेतला. आंदोलकांच्या भेटी घेण्यासाठी दुसऱ्या दिवशीहीमंत्री, नेते व विविध गावचे लोक आले होते.
शनिवारी फुलंब्री येथे गेवराई पायगा येथील सरपंच मंगेशसाबळे यांनी त्यांची कार पेटवून लाठीहल्ल्याचा निषेध केलाहोता. रविवारी याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. जिल्ह्यातील भोकरदन व हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजारयेथे दोन तरुणांनी त्यांच्या दुचाकी पेटवून घोषणा देत पोलिस प्रशासन व सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० गावांत बंद पाळण्यात आला.पैठणसह विविध गावांत रास्ता रोको करण्यात आला. जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर, संभाजीनगर, पैठण एसटी बस आगारातून एकही बस सुटली नाही. सोमवारी जिल्हा बंद असल्याने बस बंदच राहणार असल्याचे सांगण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे कडकडीत बंद पाळण्यातआला. केवळ तुळजापूर, सोलापूर मार्गावर चार फेऱ्या,नळदुर्ग, उमरगा आगारातून एक फेरी झाली.
बीड जिल्ह्यात गुळज येथे जलसमाधी आंदोलन केले गेले.बससेवा सुरू होती, पण फेऱ्या कमी करण्यात आल्या.परभणी जिल्ह्यात रविवारी २ गावांत बंद पाळण्यात आला, लाठीचार्ज घटनेची चौकशी करून दोषीवर कारवाईकरावी या मागणीसाठी रविवारी दुपारी वसमत तालुक्यातील नहाद येथील विनोद बोरगड यातरुणाने दुपारी तीन वाजता जवळाबाजार येथील मुख्य चौकात येऊन स्वतःची दुचाकी पेटवूनदिली. पोलिसांनी विनोद याला ताब्यात घेऊन त्यानंतर सोडून दिले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम