ठाकरेंच्या टिकेनंतर भाजपची बोचरी टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ फेब्रुवारी २०२३ । काल पुण्यात कोणीतरी आलं होतं. त्यांनी विचारलं, महाराष्ट्रात काय सुरू आहे? त्यावर हे म्हणाले, आज चांगला दिवस आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह सोबत आलेल्या गुलामांना देऊन टाकलं. मग तो व्यक्ती म्हणतो, वाह! मो गँबो खूश हुआ. होय ते मो गँबोच आहे. मिस्टर इंडियात असच होतं ना. देशातील लोक भांडत राहावे आणि आपण राज्य करायचं, असच मो गँबोला वाटत होतं, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी अमित शाहांना टोला लगावला होता. त्यावर आज भाजपने बोचरी टीका करत उद्धव ठाकरे म्हणजे हिंदी चित्रपटातील असरानी आहेत, असं म्हटलंय.

भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीने टीका होत असेल तर आम्हीही मर्यादा पाळणार नाहीत. उद्धव ठाकरे तुम्हीसुद्धा हिंदी चित्रपटातील असरानीसारखे झाला आहात. तुम्ही शोले चित्रपटातल्या असरानीसारखे आहात, अशी शेलकी टीका आशिष शेलार यांनी केली.

भास्कर जाधव अजून शिशुवर्गात आहेत, मी त्यांच्यावर बोलणार नाही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल ठाकरे गट आला कुठून? या गटाला कुणाचीही मान्यता नाही विधान परिषद, विधानसभा किंवा न्यायालयाने या गटाला मान्यता दिलेली नाही  केंद्रीय गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीने टीका होत असेल तरआम्हीही मर्यादा पाळणार नाही तुम्हीसुद्धा हिंदी चित्रपटातील असरानीसारखे झाला आहात शोले चित्रपटातल्या असरानीसारखे तुम्ही आहात, असं शेलार म्हणाले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम