बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

पारोळा
तालुक्यातील एकमेव सीबीएसई बोहरा सेन्ट्रल स्कूल येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, डायरेक्टर श्वेता बोहरा, शाळेचे प्राचार्य शोभा सोनी, ऍडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखा व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत लेखक/साहित्यकर – मुंशी प्रेमचंदजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. हिंदी दिवस निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. वर्ग 6 वी ते 8 वी च्या मूलांनी गीत गायन, कविता वाचन, तसेच हिंदी विषयी माहिती सांगणारी छोटी-सी नाटिका 9 वी च्या मुलींनी सादर केली.

तसेच 4 थी व 5वी च्या मूलांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगत हिंदी विषयावर भाषण दिले. शाळेच्या प्राचार्य व चेअरमन यांनी हिंदी विभाग प्रमुख- जयश्री सोनवणे, हिंदी विषयाचे शिक्षक , हितेंद्र परदेशी, श्रद्धा मुंदाणकर, सागर शिंपी, सुरेखा सोनगडकर, हेमलता चव्हाण, लीना मराठे यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित केले.

संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा यांनी सर्व शिक्षकांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम