बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे पत्रकार दिन, पत्रकार बांधवां सोबत उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

पारोळा शहरातील सीबीएसई बोहरा सेंट्रल स्कूल येथे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन हा शहरातील सर्व पत्रकारांसोबत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, पारोळा एरंडोल मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते हा गुणगौरव सोहळा पार पडला.

प्रसंगी शाळेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, सेक्रेटरी प्रकाश बोहरा, डायरेक्टर डॉ. गौरव बोहरा, श्वेता बोहरा, प्रिन्सिपल शोभा सोनी, ऍडमिनिस्टर वीरेंद्र सखा, व उपस्थित पत्रकार बांधव व पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष व शहरातील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील व भूपेंद्र मराठे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व फुलमाळा अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या लोकशाहीचे स्तंभ म्हणून गणले जाणारे पत्रकार बांधव, त्यांचे वृत्तपत्राच्या माध्यमातून होणारे जनजागृती व समाजसेवा व अन्याय विरोधात घेतली जाणारी दखल इत्यादी सर्व गोष्टींसाठी त्यांचे हे अमूल्य असे असे आपल्या देशा प्रतीचे योगदान पाहता त्यांच्या या कार्याचे कौतुक म्हणून या पत्रकार दिनाचे औचित्य साधून बोहरा शाळेत, आमदार अमोल पाटील व संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा यांच्या हस्ते शहरातील सर्व पत्रकार बांधवांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या गौरव सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, भूपेंद्र मराठे, भिकाभाऊ चौधरी, अभय पाटील, योगेश पाटील, रमेश जैन, दिलीप सोनार, अशोककुमार ललवाणी, विशाल महाजन, दीपक भावसार, बाळू पाटील, प्रदीप पाटील, प्रतीक मराठे, बापू वाडीले,प्रकाश पाटील, सुनील महाजन, राकेश शिंदे, जितेंद्र वानखेडे, विश्वास चौधरी, संजय पाटील, मच्छिंद्र शेलार, विकास चौधरी इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने, शाळेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा व प्राचार्य शोभा सोनी यांचे सर्व पत्रकारांच्या वतीने पत्रकार बांधवांच्या केलेल्या या सन्मान सत्कारा साठी आभार व्यक्त केले. व या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार अमोल पाटील यांनी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देऊन पारोळा शहरात आपण लवकरच पत्रकारांसाठी पत्रकार भवन तयार करू असे आश्वासन देऊन सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम