खोके घेऊन बोके माजलेत; ठाकरे गटाच्या दिघेनी साधला सत्तारांवर निशाणा
दै. बातमीदार । ७ नोव्हेबर २०२२ राज्यातील शिंदे सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे गेल्या दोन ते तीन वेळेस राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली पण यावेळी केलेली टीका त्यांना चांगलीच महागात जाणार असल्याने राष्ट्रवादीने त्यांना २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर राजकीय नेत्याकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यादरम्यान केदार दिघे यांनी खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत अशा शब्दात सत्तारांवर निशाणा साधला आहे.
आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी सोशल मिडीयावर याबद्दल पोस्ट लिहीली आहे, त्यांनी म्हटले की, “मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्या बाबत त्यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा महिलांचा सन्मान ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे…खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत.”
सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम