धनुष्यबाण भाजपकडे गहाण ठेवले ; ठाकरे गट आक्रमक !
दै. बातमीदार । १८ फेब्रुवारी २०२३ । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे गटाचे असल्याचा निर्णय दिला आहे. त्यावर ठाकरे गटातील नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
आज पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपने निवडणूक आयोगावर ताबा मिळवला आहे. सत्तेसाठी फितूर झालेल्यांकडून निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. केवळ गुणवत्तेच्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला नाही. भाजपकडून शिंदे गटाचा वापर कळसुत्री बाहुलीसारखा केला जात आहे. केवळ सत्तेसाठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण भाजपकडे गहाण ठेवले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपनेच शिंदे गटाला धनुष्यबाण मिळवून दिले, असा समज जनमानसात पसरत आहे. शिंदेंचे अस्तित्व भाजपमुळे संपत आहे. हे अजून शिंदेंना लक्षात आलेले नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुद्दयावर भाजपच्या संमतीशिवाय एकनाथ शिंदेंनी चकार शब्द काढला नाही. सीमावादावर देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत भूमिका स्पष्ट केल्यवावरच एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका मांडली होती. भाजपकडून शिंदेंना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम