ब्रेकिंग : खरगोन जिल्ह्यात पुलावरून प्रवाशांनी भरलेली बस कोसळली ; 15 जणांचा मृत्यू !
दै. बातमीदार । ९ मे २०२३ । मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरगोन जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. बस नदीत कोसळल्याने अपघातात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी असल्याची आहेत. सद्यस्थितीत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे. खरगोन ठिकरी महामार्गावर हा अपघात झाला आहे
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर सुमारे 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. बस क्रमांक MP10-P-7755 ही मां शारदा ट्रॅव्हल्सची आहे, जी खरगोन जिल्ह्यातून इंदूरला जात होती. खरगोन-ठीकरी मार्गावर हा अपघात झाला. बस नदीवरील पुलावरून जात होती, तेव्हा अचानक ती खाली पडली. मोठा आवाज झाला आणि गोंधळ झाला. बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते. दसंगा गावाजवळ हा अपघात झाला. गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. गावकऱ्यांसह पोलीस कर्मचारी जखमींना मदत करण्यात गुंतले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी जोशी हेही घटनास्थळी रवाना झाले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले आमदार रवी जोशी यांच्याशी संवाद साधला असता, गावकऱ्यांनी सांगितले की, बसेस दररोज भरधाव वेगाने जातात. अनेकवेळा आम्ही बसचालकांना अडवले, पण ते दादागिरी करतात.
या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. खरगोन येथील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार रुपये, किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. यासोबतच अपघातातील जखमींवर योग्य उपचाराची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम