ब्रेकिंग : सिक्कीममध्ये हिमस्खलन ७ जणाचा दुर्देवी मृत्यू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ एप्रिल २०२३ ।  सिक्कीममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गंगटोक नाथूला सीमावर्ती भागात आज मंगळवार मोठा हिमस्खलन झाला. या घटनेत ७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. जवळपास ८० पर्यटक अडकल्याची भीती आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हि घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास झाली. मृतांमध्ये चार पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हिमस्खलनानंतर गंगटोक ते नाथू ला जोडणाऱ्या १५ व्या मैल जवाहरलाल नेहरू मार्गावर बचावकार्य सुरू आहे.

 

बर्फात अडकलेल्या २२ पर्यटकांची सुटका करण्यात आली. त्यांना गंगटोक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच रस्ता मोकळा केल्यानंतर अडकलेल्या ३५० पर्यटकांची आणि ८० वाहनांची सुटका करण्यात आली. भारत-चीन सीमेजवळील नाथू ला या उंच पर्वतीय खिंडीजवळ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाला. हिल पास समुद्रसपाटीपासून ४,३१० मीटर (१४,१४०फूट) उंचीवर आहे आणि एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम