ब्रेकिंग – ‘धनुष्यबाण’ कोणालाच नाही; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ ऑक्टोबर २०२२ । शिवसेनेत झालेली दुफळी पाहता निवडणूक आयोगाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणीही ‘शिवसेना’ हे नावाचा वापर करू नये , असा आदेश भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) ने दिला आहे. तसेच, सदर बाबतीत सोमवार दि. १० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

शिवसेनेतील झालेली मोठया फुटीमुळे राज्यात नव्हे तर देशात इतिहास घडला, आणि महाविकास आघाडीचे सरकार मधील शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरची सुप्रीम कोर्टात झालेली न्यायालयीन लढाई संपूर्ण देशाने पाहिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे सुनावणी होईल असे आदेश देण्यात आले.आणि मग निवडणूक आयोग काय निर्देश अथवा आदेश देणार ते संपूर्ण देशाला अपेक्षित होते आणि तेच निर्णय आयोगाने दिले. ते संपूर्ण देशाने पाहिले आहेत. याचाच अर्थ म्हणजे निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे गोठवले असल्याचे आयोगाच्या निकलावरून स्पष्ट होते. आणि हे अपेक्षित होते. निवडणूक आयोग काय निर्णय देऊ शकतो हे.ल सर्वसामान्य जनतेला ठाऊक होते. त्याचे कारण सांगण्याची गरज नाही.

सदर निकाल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे. हे उद्धव ठाकरे यांना देखील सम्ह्ट होते, पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे उद्धव ठाकरे विसरलेत, आणि त्यांना न भूतो न भविष्यती असा फटका बसला

खरी शिवसेना कोणाची? यावर अद्याप निवडणूक आयोगाला निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हा हंगामी निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना विधानसभा निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्काच मानला जात आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पोटनिवडणूक होणार असून ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार जाहीर केला नाही, पण शिवसेनेने स्व. रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर भाजपा मुरजी पटेल यांना उमेदवारी देणार असल्याचे चर्चा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम