दै. बातमीदार । ६ मार्च २०२३ । अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची माहिती स्वत: बीग बींनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे.
टीन या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान अमिताभ यांना अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यांनी ट्विटरवरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. काळजीची बाब नाही. वेदना होत आहे, पण दुखापत झालेल्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, बर्फ लावत असून पेनकिलरही घेतली आहे. 48 तासांत बरा होईन, असे डॉक्टरांनी सांगितले. टीन एक थ्रिलर चित्रपट असून अमिताभ मागील अनेक दिवसांपासून कोलकातामध्ये शूटिंग करत आहेत. या सिनेमात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असून नवाजुद्दीन सिद्दीकी याचीही महत्त्वाची भूमिका आहे. ‘टीन ‘च्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात ते स्कूटर चालविताना दिसत आहेत.
“मी बरा होईपर्यंत सर्व कामे थांबवण्यात आली आहेत. मी जलसात विश्रांती घेत आहे. फक्त आवश्यक गोष्टींसाठी थोडेसे चालावे लागणार. होय, आराम तर सुरूच राहणार. मी जलसाच्या गेटवर माझ्या चाहत्यांना भेटू शकणार नाही, हे सांगणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. जलसावर येण्याचा विचार करणाऱ्यांना सध्या त्यांना याची माहिती द्या. बाकी सर्वकाही ठीक आहे.”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम