मराठी नववर्षात घरी आणा तुमच्या बजेटमधील दुचाकी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ मार्च २०२३ । देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालेली असतांना प्रत्येकाची आशा असते कि आपल्याकडे दुचाकी असावी अशा लोकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा हा सण अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. या मुहूर्तावर गृहप्रवेश, सोनंखरेदी, वाहनखरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यातच तुम्ही दुचाकी घेवू शकतात. पुढील आठवड्यात साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जर तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

कारण आता होंडा कंपनी त्यांची नवीन बाईक लाँच करीत आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया कंपनी नवीन 100cc बाईक लाँच करून स्वतःचा पोर्टफोलिओ अपडेट करण्यासाठी सज्ज झालीय. आज, बुधवार (15 मार्च 2023) रोजी भारतामध्ये ही कंपनी नवीन कम्युटर बाईक लाँच करणार आहे. कंपनीनं याबाबत अधिकृत माहिती शेअर केलीय. पण ही नवीन 100cc बाईक नेमकी कशी असेल, त्यामध्ये कोणकोणती फीचर्स असतील आदींबाबत अद्याप कंपनीकडून गुप्तता पाळण्यात आलीय.

कंपनीनं काही दिवसांपूर्वी एक टीझर प्रदर्शित केला होता. ‘शायनिंग फ्युचर’ या कॅप्शनसह आलेला हा टीझर सीबी शाइन ब्रँड अंतर्गत येणाऱ्या नवीन बाईककडे इशारा करीत होता. या टीझरवरून नवीन बाईक कशी दिसत असेल, याचा एक अंदाज येत होता. टीझर व्हिडिओवरून अंदाज येत होता की, नवीन होंडा 100cc बाईकला 125cc सीबी शाइन प्रमाणेच फ्रंट स्टाइल मिळेल. फीचर्स लिस्टमध्ये बोल्ड हेडलॅम्प, सिंगल-पीस सीट, साइड-स्लंग एक्झॉस्ट, टेलिस्कोपिक फोर्क, अलॉय व्हील्स आणि ड्युअल शॉक अब्झॉर्बरचा समावेश असू शकतो. या नवीन बाईकच्या इंजिनबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. परंतु या बाईकमध्ये 100cc सिंगल-सिलेंडर, फ्युएल-इंजेक्टेड मोटर असू शकते. बाईकचे इंजिन 8 बीएचपी जास्तीत जास्त पॉवर आणि 8 एनएम पीक टॉर्क निर्माण करणारे असू शकते, असा अंदाज आहे.

होंडाची या नवीन 100cc बाईकची किंमत ही सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असू शकते. या बाईकमध्ये बजेट-फ्रेंडली हार्डवेअर मिळू शकेल. बेस व्हेरियंटला दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक असतील, असा अंदाज आहे. तसेच प्रीमियम व्हेरियंटमध्ये डिस्क ब्रेक असू शकतो. शिवाय, सस्पेन्शन सेटअपमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स अपफ्रंट आणि ट्विन साइड स्प्रिंग्ज रिअर एंड असू शकतात. नवीन कम्युटर बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच झाल्यानंतर तिची स्पर्धा हिरो स्प्लेंडर, बजाज प्लॅटिना आणि टीव्हीएस रेडियन या बाईकशी असेल. परंतु गुढीपाडव्याला जर तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी होंडाची ही बाईक चांगला पर्याय ठरू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम