परळीत पुन्हा भावा-बहिणीचे राजकारण रंगले !
दै. बातमीदार । १२ मार्च २०२३ । राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या कुरघोड्या ह्या काही आता नवीन राहिलेल्या नाही तर दुसरीकडे परिवारातील देखील राजकारण राज्यातील तमाम जनता अनुभवत आहे, तर मराठवाड्यातील मुंडे परिवारातील राजकीय संघर्ष कुठेही संपण्यात नव्हे तर दिवसेदिवस टीका टिपणी करीत वाद वाढत असतांना दिसून येत आहे. बीडच्या परळीत विकास कामांच्या उद्घाटनावरून मुंडे बहीण भावात श्रेयवादाची लढाई सुरू झाली. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आमचे सरकार असताना आमच्या कामाचे उद्घाटन तुम्ही का करता असा सवाल उपस्थित केला होता.
त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले असून ‘लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, पण मागच्या 5 वर्षाच्या काळात लोकांचे कल्याण तुम्ही केले नाही हे दुर्दैव आहे’ असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला. परळीच्या टोकवाडी या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी धनंजय मुंडे बोलत होते. असे एक तरी काम आपण केले आहे का ? 2010 ला मला माझ्या घरातून बाहेर काढलं मला पक्षातून काढलं, मला शिव्या दिल्या मात्र 2017 ला पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आणली, अन् खऱ्या अर्थाने इथून मी राष्ट्रवादीला मजबुती दिली फक्त मीच नाही तर माझ्यासोबत मी माझ्या सहकार्यांना ही मोठं केलं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
‘मी मागच्या 3 वर्षात मंत्री असताना मी माझ्या मतदार संघातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले. मात्र हे मागच्या लोकांना का केले नाही,ही काही टीका नाही मात्र ते आम्हाला म्हणतात की नाही फक्त आयत्या पीठावर रेघोट्या मारत आहे, अशी टीकाही मुंडेंनी केली. ‘आम्हालाही तुमच्या मागच्या 10 वर्षात तुम्ही कोणते विकास कामं केली. हे आम्हालाही विचारण्याचा अधिकार आहे मात्र आम्ही विचारात नाहीत ते आम्हला काढायचे नाही.
आम्हाला फक्त या मतदारसंघातील जनतेचा विकास करायचा आहे, असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर साधला निशाणा. ‘जलजीवन मिशन योजना केंद्राची आहे. यात माझा काय संबंध पण महाविकास आघाडी सरकार असतांना या गावातील योजनेचा आराखडा मी अगोदरच केला आहे म्हणून मी ठोकपणे हे भूमिपूजन करत आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले. सरकार जरी बदललं तरी आपलं काहीच फरक पडत नाही कारण कोणत्याही सरकार आले तरी, या परळीला दिल्या शिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. अशी तरतूद मी केली आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम