दोन सख्या भावांचा खुनानंतर एका गुन्हेराची निर्घृण हत्या !
बातमीदार | २ सप्टेंबर २०२३ | जळगाव जिल्हा पुन्हा मध्यरात्री दोन सख्या भावांचा खून तर कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची निर्घृण हत्या दि.१ सप्टेंबर २०२३ रोजीच्य मध्यरात्री घडली आहे. यांनंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले होते.
भूसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार व चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेत अन्य दोघे जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, खुनाच्या कारणामागे जुने वाद असल्याचे कारण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले असून हल्लेखोर खुनानंतर पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. कंडारीतील दुहेरी खुनाची घटना समोर आल्यानंतर भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले असून हल्लेखोरांची माहिती काढण्याचे काम यंत्रणेने सुरू केले आहे.
कुविख्यात निखील राजपूतची हत्या !
भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे पाच वाजता समोर आल्याने भुसावळसह जिल्ह्यात खळबळ मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे २४ तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकार्यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर निखिल व संशयितांमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाद झाल्यानंतर निखिलच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत त्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून निखील राजपूतची ख्याती होती शिवाय यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होती. शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर तो झोपला असताना त्याचा कौटुंबिक कारणातून वाद झाला व वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटूंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर रक्ताच्या थारोळ्यात निखील राजपूतचा मृतदेह आढळला असून तो शवविच्छेदनासाठी हलवण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम