भाजपनंतर राष्ट्रवादी लोकसभेसाठी अ‍ॅक्शन मोडवर ; पवारांनी बोलवली बैठक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जानेवारी २०२३ राज्यात भाजपचे अध्यक्ष जे.पी.नडद्दा येवून गेल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. त्यांनीही लोकसभेसाठी कंबर कसली आहे. आज पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची राजकीय भूमिका नेमकी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षकार्यर्त्यांसोबत संवाद साधला जाणार आहे.

तसेच प्रत्येक तालुक्याचा अंदाज घेऊन कार्यकर्त्यांना त्यासंबंधी आवश्यक सूचना शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना दिल्या जाणार आहेत. त्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. यावेळी बोलताना इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी सांगितलं की, पुणे जिल्हयातील शिरूर व बारामती या तालुक्यातील आज बैठक झाली.

या बैठकीत प्रत्येक तालुक्यातील संघटनांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकीचा आढाव ही यावेळी घेतला गेला. यावेळी वरीष्ठ नेत्यांची काय मदत घेता येईल याची माहिती यावेळी दिली.

राष्ट्रवादीची पुणे जिल्ह्यात ताकद जास्त आहे त्यामुळे अंतर्गत मतभेद देखील आहेत त्यावर तोडगा काढण्या बाबत चर्चा झाली, तर ते पुढं म्हणाले, शिरूर बारामती मध्ये कोणी आलं तर येथ राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारच निवडून येईल. बाहेरच कोणी ही आला तरी लोक इथं राष्ट्रवादीलाच ताकद देतील असा विश्वास या वेळी त्यांनी बोलून दाखवला. तर अजित पवारांची पाठ राखन करताना म्हणाले, राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्ष हटवण्यासाठी अजितदादा यांच्यावर वर टीका होत आहे, आम्ही स्वराज्य रक्षकच म्हणणार,ज्यांना काय म्हणायच ते म्हणा. तर या बैठकीत पक्षातील अंतर्गत गटबाजी उफळून आली विषेश म्हणजे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरचं त्यांमुळे आता शरद पवार काय भुमीका घेणार हे पाहवं लागेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम