दुबईत इमारतीला भीषण आग ; ४ भारतीयांचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ ।  जगभरातून व्यापारानिमित्त यासह उन्हाळ्यात पर्यटणासाठी प्रसिद्ध असलेल्या दुबई येथे एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत १६ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. त्यात मृतांमध्ये ४ भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. या भारतीय नागरिकांमध्ये केरळमधील मलप्पुरम येथील वेंगारामध्ये राहणारे 38 वर्षीय रिजेश आणि त्यांची 32 वर्षीय पत्नी जिशी, तसेच तामिळनाडूचे रहिवासी अब्दुल कादर आणि सलियाकुंड आहेत.

सरकारी-संलग्न वृत्तपत्र ‘द नॅशनल’ने दुबई मीडिया ऑफिसद्वारे प्रदान केलेल्या ‘दुबई सिव्हिल डिफेन्स’ च्या निवेदनाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, या आगीच्या घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. शनिवारी दुबईच्या अल रास भागात आग लागली. येथे दुबईचे मसाले बाजार भरते, जे दुबई खाडीजवळ पर्यटनाचे एक मोठे केंद्र आहे.

दुबई पोलिसांच्या शवागारात उपस्थित असलेले भारतीय सामाजिक कार्यकर्ते नसीर वतनपल्ली यांच्या हवाल्याने वृत्तपत्राने म्हटले आहे की, मृत्यूंमध्ये केरळमधील एका जोडप्यासह चार भारतीयांची ओळख पटली आहे. वतनपल्ली म्हणाले, ‘आतापर्यंत आम्ही 4 भारतीयांना ओळखण्यात यशस्वी झालो आहोत, ज्यात केरळमधील एक जोडपे आणि इमारतीत काम करणाऱ्या तामिळनाडूतील दोन पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय 3 पाकिस्तानी तरुण आणि एका नायजेरियन महिलेचाही मृत्यू झाला आहे. सरकारच्या निवेदनात आगीचे कोणतेही कारण दिलेले नाही, परंतु पाच मजली अपार्टमेंटमध्ये काही समस्यांमुळे आग लागल्याचे सूचित केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने इमारत सील केली आहे. त्यामुळे आगीतून वाचलेली सर्व कुटुंबेही रातोरात बेघर झाली. खलीज टाईम्सने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितले की, ‘आम्ही पहिल्यांदा एसीमधून आग निघताना पाहिली. काही मिनिटांनी स्फोटाचा आवाज ऐकू आला… त्यानंतर आग काही वेळातच पसरली आणि धुराचे लोट उठताना दिसत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम