टोलनाकाच जाळून टाकू ; राज ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ ऑक्टोबर २०२३

गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील टोल नाक्याच्या प्रश्नावर नेहमीच मनसे आक्रमक भूमिका मांडत असते. नुकतेच ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरु केले आहे. प्रवाशांच्या खासगी दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. केवळ व्यवसायिक वाहनांकडून टोल वसुल केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रविवारी म्हणाले होते. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत कडाडून हल्ला चढवला. फडणवीस तसे म्हणत असतील तर आम्ही टोलनाक्यांवर आमचे माणसे उभे करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला.

राज ठाकरे यांनी आज आपले निवासस्थान शिवतीर्थ येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी टोलवसुली हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला. राज्यातील टोलवसुलीवर अनेक राजकारण्यांचे उदरनिर्वाह होत आहे. अनेकांना या टोलवसुलीतून दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला पैसे मिळतात. त्यामुळे हे नेते कधीही चांगले रस्ते होऊ देणार नाही. प्रत्येक टोलनाक्यावरुन किती टोलवसुली होत आहे? कधीपर्यंत टोलवसुली केली जाणार आहे? याचा हिशेब झालाच पाहीजे, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत तब्बल सात व्हिडिओ दाखवत देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे या सर्वांवरच हल्ला चढवला. निवडणुकीपूर्वी या सर्व नेत्यांनी आपल्या प्रचार सभेत आपण टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर यातील प्रत्येक नेता सत्तेत आला. मात्र, कुणीही टोल बंद केले नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली. राज ठाकरेंनी यावेळी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस तसेच दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे प्रचारसभेचे व्हिडिओ दाखवले. यामध्ये हे सर्व नेते टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन देताना दिसत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम