बसचा अग्नित्तांडव : ब्रेकफेल झाल्याने चार दुचाकीस्वारांना चिरडले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील नाशिक मध्ये पुन्हा बसचा अग्नित्तांडव पाहायला मिळाला आहे. हा अपघात इतका विचित्र होता कि बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना उडवल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसचा समावेश आहे. यातील एका बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चार ते पाच दुचाकीस्वरांना चिरडून या बसचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात होरपळून आत्तापर्यन्त तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून दोघे गंभीर जखमी आहेत. जखमी प्रवाशांसह इतर सर्व सुरक्षित प्रवाशांना देखील नाशिक जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने नाशिकमध्ये मिर्ची हॉटेल परिसरात झालेल्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मिर्ची हॉटेल परिसरात देखील तेरा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर देखील सलग वाहनांना आग लागळ्याच्या घटना समोर आल्या होत्या मात्र जीवित हानी झालेली नव्हती. मात्र, आजच्या दिवशी लागलेल्या आगीत पुन्हा जीवित हानी झाल्याने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये पुन्हा बसला आग लागून त्यात प्रवाशांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात आहे. सिन्नर जवळ हा भीषण अपघात झाला आहे.

नाशिकवरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बसला आग लागली आहे. बसने आणखी एका बसला धडक दिली असून दुचाकीस्वरांना देखील चिरडल्याची बाब समोर आली आहे. एकूणच या अपघाताच्या संदर्भात चौकशी करून कारवाईची मागणी होऊ लागली आहे. वारंवार राज्य सरकारच्या बसला आग लागळ्याच्या घटना समोर येत असल्याने याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशीही मागणी होत आहे. नाशिकमध्ये देखील काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर शहरातील ब्लॅक स्पॉट ठरवून तिथे तात्काळ कारवाई कारवाई सुरू झाली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम