सोने खरेदी करत आहात हि बातमी तुमच्यासाठी !
दै. बातमीदार । ६ मार्च २०२३ । देशात महागाई सुरु असतांना सध्या लग्नाची धामधूम देखील सुरु आहे. यात सोन्याचे दर देखील काही दिवस स्थिर तर काही दिवस वाढू लागल्याने सर्व सामान्य ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे. तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही दागिने खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे सोनं खरेदी करण्यासाठीचे नियम बदलले आहेत.
तुम्हाला हे नियम माहिती नसतील तर तुमचं नुकसान होऊ शकतं. आधीच सोनं 56 हजारवर आहे. त्यामुळे एवढे पैसे मोजताना आपल्या एका चुकीमुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. केंद्र सरकारने सोनं खरेदीचे नियम बदलले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर नवीन नियम काय आहेत सोप्या भाषेत समजून घेऊया.
31 मार्च 2023 पासून, हॉलमार्कचे नसलेले दागिने वैध मानले जाणार नाहीत. केंद्र सरकारने सोन्या व दागिन्यांच्या खरेदी व विक्रीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ग्राहकांच्या हितासाठी निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 6 अंकी अल्फा न्यूमरिक डिजिट असलेले होलमार्क नसेल तर दागिने वैध धरले जाणार नाहीत त्यामुळे दागिने खरेदी करताना काळजी घ्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम