घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांकडून सुमारे २ लाख १९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरी

बातमी शेअर करा...

भडगाव प्रतिनिधी :-

शहरातील विद्यानगर येथील डॉक्टर प्रकाश दत्तात्रय भोसले यांचे चाळीसगाव रोडवरील घराचे कुलूप लावलेल्या घराच्या जिन्यामधील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख १९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५:४५ ते ७:१५ दरम्यान उघडकीस आली आहे. याबाबत भडगांव पोलिसात मध्यरात्री २ वाजता आज्ञात चोरट्यांन विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की डॉक्टर भोसले यांच्या घरी सायंकाळी ५:३० वाजतापर्यंत घरी कोणीही नव्हते. त्यानंतर ते घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप उघडता आले नाही. त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. तपासात असे आढळून आले की, चोरट्यांनी घराच्या जिन्यामधील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. त्यांनी घरातील सोने, दागिने, रोख रक्कम, घड्याळ असे एकुण २ लाख १९ हजार ४०० पंचा मुद्देमाल चोरला गेल्याचे आढळून आले आहे.

घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले असुन ठसे पथकही सोबत होते. घरा मागील असलेले नामांकित धनदाई मोटार गॅरेज यांचे दुकानातील CCTV कॅमेऱ्यात सदर चोरटे पळ काढतांना दिसून येत आहेत. या अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्यादी प्रकाश दत्तात्रय भोसले यांच्या फिर्यादी वरून भडगाव पोलीस स्टेशनला गु.र.नं ३७१/ २०२३ अन्वये भादवी कलम ४५७,४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम