
महिना अखेरीस सोन्याचे दरात वाढ !
दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ । देशात वाढती महागाई सुरु असल्यावर देखील अनेक ग्राहक बाजारात सोन्यासह चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी सुरु असतांना काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती तर आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा सोन्याचे दर वाढले आहे. सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. वीकेंडला सोने खरेदीकडे लोकांचा खूप कल असतो त्यामुळे सोन्याच्या दरातील ही वाढ अपेक्षित होती.
गोल्ड रिटर्न वेबसाईटनुसार आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 55,850 तर 24 कॅरेट साठी 60,930 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 762 रुपये आहे.
चेन्नई – 61,440 रुपये
दिल्ली – 61,080 रुपये
हैदराबाद – 60,930 रुपये
कोलकत्ता – 60,930 रुपये
लखनऊ – 61,080 रुपये
मुंबई – 60,930 रुपये
नागपूर – 60,930 रुपये
पुणे – 60,930 रुपये
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम