केवळ ७ मिनिटात होणार कर्करोगावर उपचार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० ऑगस्ट २०२३ | देशभरातील अनेक रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. त्यातील खूप घातक असलेल्या कर्करोग या आजाराचे अनेकांना धोकादायक आणि प्राणघातक आजार असतो. हा आजार संपूर्ण शरीरभर पोहोचण्याआधी त्यावर औषधोपचार करणे आवश्यक असते. या आजारावर उपचार करण्यासाठी बराच कालावधी लागतो. परंतु आता काही मिनिटांमध्ये यावर उपचार सुरू करणे शक्य होणार आहे.

कर्करोगाच्या रुग्णांना सात मिनिटांत इंजेक्शन देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरणार असल्याचे वृत्त आहे. ब्रिटनची सरकारी नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) ही जगातील पहिली अशी सेवा बनणार आहे, जी देशातील शेकडो कर्करोग रुग्णांवर कमी वेळेत एकाच इंजेक्शनने उपचार करू शकते आणि उपचाराचा कालावधी तीन चतुर्थांश कमी करू शकते.
इम्युनोथेरपीने उपचार घेत असलेल्या शेकडो कर्करोगाच्या रुग्णांना आता त्वचेच्या खाली ‘एटेझोलिझुमॅब’चे इंजेक्शन देण्याची तयारी केली जात आहे.यामुळे कर्करोगाच्या उपचारासाठी लागणारा वेळ कमी होईल. राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) च्या माहितीनुसार, एटेझोलिझुमॅब, ज्याला टेसेंट्रिक देखील म्हणतात. टेसेंट्रिक हे एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे, जे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेवर परिणाम करते. सामान्यतः रुग्णांना हे थेट त्यांच्या नसांमध्ये ड्रिपद्वारे दिले जाते. काही रुग्णांसाठी ही प्रक्रिया सुमारे 30 मिनिटे किंवा एक तासापर्यंत चालते. तर काहींना जास्त वेळ लागतो.आता नवीन पद्धतीमुळे हे औषध इंट्राव्हेनस ऐवजी त्वचेखाली टोचले जाणार आहे.

रॉयटर्स या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार,’या पद्धतीमुळे आम्हाला आमच्या रुग्णांची अधिक सोयीस्कर आणि अती वेगाने काळजी घेता येणार आहे. तसेच आमच्या टीमला दिवसभरात अधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे, असे वेस्ट सफोक एनएचएस फाउंडेशन ट्रस्टचे सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अलेक्झांडर मार्टिन यांनी म्हटले आहे. तसेच ज्या प्रक्रियेला पूर्वी 30 ते 60 मिनिटे लागत होती, तीच प्रक्रिया आता अवघ्या 7 मिनिटांमध्ये पूर्ण होणार असल्याच रोश प्रोडक्ट्स लिमिटेडचे मेडिकल डायरेक्टर मारियस शुल्ट्ज़ यांनी म्हटले आहे.
एटेझोलिझुमॅब हे एक इम्युनोथेरपी औषध आहे जे रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तींना कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी सक्षम करते. सध्या, फुफ्फुस, स्तन, यकृत आणि मूत्राशयाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाने पीडित रुग्णांवरील उपचारांसाठी याचा वापर केला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम