भाजप आ.गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात; पुण्यात उपचार सुरु !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ डिसेंबर २०२२ । आज पहाटे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गाडी ५० फुट खोल दरीत कोसळली. यावेळी गाडीत आमदार गोरेंसह चौघे जण होते. जखमींना उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आलं. तर गोरे यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे. गोरे हे सातारा जिल्ह्यातील मान-खटावचे आमदार आहेत.

साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे मुंबईहून आपल्या घराकडे रवाना होत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. साताऱ्यातील फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात होऊन गाडी तब्बल 50 फूट दरीत कोसळली. नदीच्या पुलाचा कठडा तोडून गाडी 50 फूट खाली कोसळली. साताऱ्यातील फलटणजवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना गाडीला अपघात झाला आणि गाडी 50 फूटांवरुन खाली कोसळली. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यासोबत इतरही तिघं होते त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम