कोल्हापूर दंगलीनंतर मनसे नेत्यावर गुन्हा दाखल !
दै. बातमीदार । ८ जून २०२३ । राज्यातील कोल्हापूरात आंदोलन दरम्यान झालेल्या दंगलीनंतर मनसे आक्रमक झाली होते. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह अन्य 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37, 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिला. कोल्हापुरात झालेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर झालेल्या दंगलीच्या पडसादानंतर औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला.
वृतसंस्था एएनआयला मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कोल्हापूरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तेथील परिस्थिती तणावग्रस्त निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात पडसाद पाहायला मिळाले. यात मनसे नेते संदीप देशपांडे सह अन्य 8 जणांनी औरंगजेबाचा पुतळा दहन केला होता. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कोल्हापूर शहरातील स्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. काल शहरात झालेल्या हल्ला, दगडफेक प्रकरणी शहरातील तीन पोलिस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 400 आरोपी असून त्यातील 36 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दिली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम