मोठी बातमी : योगगुरू रामदेव बाबांवर गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ फेब्रुवारी २०२३ । योगगुरू रामदेव बाबा त्यांच्या योगाभ्यासामुळे प्रचलित आहेत. मात्र, त्यांच्या काही विधानांमुळे ते वादात आणि प्रसंगी अडचणीत सापडतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘महिलांनी कपडे घातले नाही तर त्या जास्त सुंदर दिसतात’, असं विधान करून मोठा वाद निर्माण केला होता. हे विधान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच समोर केल्यामुळे या वादाला राजकीय किनारही होती. मात्र, हा वाद शमतो न शमतो तोच बाबा रामदेव यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं. या विधानामुळे पुन्हा एकदा रामदेव बाबा अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रामदेव बाबा यांनी राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माची तुलना करताना मुस्लीम धर्मीयांबद्दल विधान केले होते. स्थानिक नागरिकाच्या तक्रारीनंतर राजस्थानच्या बरमार जिल्ह्यातील चौहतान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय म्हणाले होते रामदेव बाबा?
गेल्या दोन दिवसांपासून रामदेव बाबांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माची तुलना करताना मुस्लीम धर्मीयांबद्दल केलेलं विधान वादात सापडलं होतं. “धर्मांतराच्या बाबतीत मुस्लीम आणि ख्रिश्चन समानच आहेत. मी कुणावरही टीका करत नाहीये. पण काही लोकांना इतर धर्मातून आपल्या धर्मात धर्मांतरित करण्याची फार ओढ असते”, असं रामदेव बाबा म्हणाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम