
दै. बातमीदार । २९ डिसेंबर २०२२ । सध्या प्रत्येकाच्या घरात फ्रीज हे असतेच व त्याचा सर्वच लोक वापर देखील करतात, नेहमी आपण रात्रीचे अन्न फ्रीजमध्ये ठेवतो व सकाळी गरम करून ते खात असतो, पण काही पदार्थ असे असतात कि, ते फ्रीजमध्ये ठेवल्याने तुमचे आरोग्य धोक्यात येवून तुम्ही मृत्यूस आमंत्रण देणारी बाब ठरते. तेव्हा कुठल्या गोष्टी फ्रिजमध्ये ठेवू नये ते आज आपण जाणून घेऊया.
टमाटर – अनेक लोक फ्रिजमध्ये टमाटर ठेवतात. मात्र तुम्हाला माहितीये का की फ्रीजमध्ये टमाटर ठेवल्याने त्याची चव, रस आणि फ्लेवर जातो. शिवाय त्यातलं पोषणही संपून जातं. तेव्हा रूम टेंप्रेचरवर टमाटरला स्टोअर करायला हवं.
बटाटे – बटाटे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये त्याचे तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. तेव्हा त्याला नॉर्मल रूम टेंप्रेचरवर ठेवावे.
लसूण – लसूण कधीच फ्रिजमध्ये ठेवू नये. असे केल्याने तो आतून रबरासारखा बनतो. काय लसूण आणि कांद्यास कोरड्या जागी ठेवावे.
शिमला मिर्ची – जर तुम्ही फ्रिजमध्ये शिमला मिर्ची स्टोर करताय तर चुकूनही ही चूक करू नका. यावेळी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी की फ्रीजचं टेंप्रेचर एकदम कमी नसावं. त्याने त्याचा टवटवीतपणा जातो. आणि त्याची चवही नष्ट होते.
कांदा – कांदा कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. असे केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. शिवाय याला प्लास्टिक बॅगमध्येही ठेवू नये. कांदा आणि आलू जवळजवळही ठेवू नका.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम