सावधान : फ्रीजमध्ये कणीक ठेवताय मळून !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ ।  देशभर सुरु असलेल्या मान्सूनध्ये पावसामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळेच पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे अतिशय महत्वाचे असते. या ऋतूतील विविध बदलांमुळे शरीरातील मेटाबॉलिज्मही मंदावते. त्यामुळेच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते, त्यामुळे आजार होण्याचा धोका जास्त असतो. असे अनेक पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाणे टाळले पाहिजेत. एवढंच नव्हे तर, तुम्ही कणीक मळून फ्रीजमध्ये ठेवत असाल व नंतर त्याचा वापर करत असाल तर तेही धोकादायक ठरू शकते. म्हणून असं करणं थांबवा. फ्रीजमध्ये ठेवलेली कणकेच्या पोळ्या खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ का वापरू नये ते जाणून घेऊया.

आर्द्रतेमुळे कणीक होते खराब
कधीकधी आपण एकदाच खूप पीठ मळून घेतो आणि ते फ्रीजमध्ये बरेच दिवस ठेवून वापरतो. ते खराब होऊ नये यासाठी आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो खरं. पण पावसाळ्याच्या दिवसांत मळलेल्या पिठात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. काही अशा बॅक्टेरियामुळे फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच असे अन्न खाल्ल्यामुळे ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठताही होऊ शकतो.

कमी टेंपरेचरमध्ये बॅक्टेरिया
एका संशोधनानुसार, कमी तापमानात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यात लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स नावाच्या बॅक्टेरियामुळे गंभीर आजार होऊ शकतात. फ्रीजच्या कमी तापमानातही हा बॅक्टेरिया सहज वाढू शकतो. त्यामुळेच फ्रीजमध्ये कोणतीही वस्तू ठेवण्यापूर्वी ती स्वच्छ करणे महत्त्वाचे ठरते.

मळलेली कणीक कशी ठेवावी ?
आरोग्यतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्याच्या दिवसात ताज्या कणकेचा वापर करणेच उत्तम ठरते. पण तुम्ही कणीक मळून ठेऊन त्याचाच वापर करणार असाल तर ती मळताना त्यात फार पाणी घालू नये. त्यामुळे कणीक लौकर खराब होऊ शकते. कणीक फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी एअर टाइट कंटेनर किंवा झिप लॉक बॅगचा वापर करावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम