सावधान : क्यूआर कोड स्कॅन करताय ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ मे २०२३ ।  देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण खूप वाढले आहे. क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्याचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. लोक क्यूआरकोडला जास्त पसंती देताना दिसत आहेत. पण याच कारणाने अनेकांच्या बँकेतील लाखो रुपये लंपास देखील होण्याच्या घटना समोर आल्या आहे.

यूपीआय वर आधारित पैसे देण्याची पद्धत लोकप्रिय ठरल्यामुळे सायबर चोरांनी या ठिकाणी आपला मोर्चा वळवला आहे. बनावट क्यूआर कोड लावून लोकांचे स्मार्टफोन हॅक करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. भारतासह अनेक देशांमध्ये हा धोका वाढला आहे. हॅकर्स खरा क्यूआर कोड ऐवजी खोटा कोड चिकटवतात. त्यातून फोन हॅक केला जातो. सर्व माहिती हॅकर्सला मिळते आणि काही क्षणात आपले बँक खाते रिकामे होते. हे सायबर भामटे एवढ्यावरच थांबत नाहीत तर तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेलदेखील करतात. त्यामुळे या लोकांपासून सावधान राहण्याचा इशारा एफबीआयकडून देण्यात आला आहे. भारत अमेरिकासोबतचं जपान, फ्रान्स ,जर्मनी, नेदरलँड, इत्यादी देशांमध्ये देखील या क्यूआर कोड स्कॅमचा धोका प्रचंड वाढला आहे.

सर्वाधिक क्यूआर कोड स्कॅनिंग प्रमाण कोणत्या देशात किती टक्के आहे ?
अमेरिका 42.2 टक्के
भारत 16.1 टक्का
फ्रान्स 6.4 टक्के
ब्रिटन 3.6 टक्के
कॅनडा 3.6 टक्के

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम